कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण
पळसखेडा तालुका केज येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्याय अंबाजोगाई येथील ग्रामीण कृषी कार्याकृमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये कृषी दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एकतरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रशांत करंजीकर यांनी केले. शाळेच्या प्रांगणात गावाचे सरपंच श्री. चव्हाण, महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. आर जी भाग्यवंत, डॉ शंकर ग. पुरी व शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील आणि त्यांचे सहकारी तसेच गावकरयाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रशांत करंजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ शंकर ग. पुरी व पळसखेडा येथील कृषीदूत आणि कृषी कन्या यांनी केले होते. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील आणि त्यांचे सहकारी श्री गोरे , महाजन Madam , ठोंबरे Madam, कृषी दूत साळुंकेसोबत सर्व कृषीदूत, कृषी कन्या आणि ग्राम कामगार सुनील मुळे यांचे विशेष सहकार्य लाभले